

'निवडणुकीमुळेच सीबीआयकडून छापे मारण्यात येत आहेत,' असा म्हणत चंद्रकला यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवरच आरोप केला आहे.


'रे रंगरेज़! तू रंग दे मुझको' ही कविता 'लिंक्ड इन'वर शेअर करत बी चंद्रकला यांनी म्हटलंय की, 'चुनावी छापा तो पड़ता रहेगा, लेकिन जीवन के रंग को क्यों फीका किया जाय.'


उत्तर प्रदेशातील IAS अधिकारी बी. चंद्रकला या सोशल मीडिया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यापेक्षाही जास्त पॉप्युलर आहेत.


सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या बी. चंद्रकला या IAS ऑफिसरच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. (सर्व फोटो सौजन्य: फेसबुक)


सध्या उत्तर प्रदेशात काम करत असलेल्या बी. चंद्रकला यांच्यावर खाण घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे.


बी. चंद्रकला यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिलेली नाही. त्यांची अनेक ठिकाणी बेनावी संपत्ती असण्याचीही शक्यता आहे.


बेनावी संपत्ती आणि खाण घोटाळ्यासंदर्भातला आरोप यामुळे सीबीआयकडून वारंवार त्याच्या संपत्तीवर छापा मारण्यात येत आहे.


बी. चंद्रकला फेसबुकवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. त्यामुळेच फेसबुकवर त्यांचे 85 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.


फेब्रुवारी 2016 मध्ये बी चंद्रकला या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी त्यांचा फोटो काढणाऱ्या एका 18 वर्षांच्या मुलाला जेलमध्ये टाकलं होतं.


या अटकेसंदर्भात विचारण्यासाठी एका रिपोर्टने चंद्रकला यांना फोन केला तेव्हा त्यांनी आपल्या उत्तरातून वाद ओढवून घेतला होता.


मूळ हैद्राबादच्या असणाऱ्या चंद्रकला यांची पहिल्यांदा युपीच्या बुलंदशहर इथं पोस्टिंग झाली होती.