

आज ( 1 फेब्रुवारी ) अर्थसंकल्प सादर होणार. पण त्याआधी बऱ्याच गोष्टी होत असतात. महत्त्वाचा असतो तो हलवा सोहळा. अर्थसंकल्पाची कागदपत्र प्रिंट होण्यासाठी गेली की अर्थमंत्रालयातले सगळे अधिकारी हलवा बनवतात आणि वाटतात. यावेळी अर्थमंत्रीही उपस्थित असतात. ( फोटो सौजन्य - ट्विटर/ @FinMinIndia )


अर्थसंकल्पाच्या संबंधित सर्व अधिकारी आणि स्टाफ यांना बाहेर कुणाशी संपर्क करायची परवानही नसते. अगदी आपल्या कुटुंबाशीही. ते अर्थमंत्रालयातच मुक्काम ठोकून असतात. ( फोटो सौजन्य- पीटीआय )


अर्थसंकल्पाची सर्व कागदपत्र नाॅर्थ ब्लाॅक इथल्या सरकारी प्रीटिंग प्रेसमध्येच पाठवली जातात. पूर्वी ती राष्ट्रपती भवनात प्रिंट व्हायची. पण 1950 रोजी काही कागदपत्र लीक झाली. त्यानंतर मिंटो रोडवर ती प्रींटिंगला जाऊ लागली. आता ती नाॅर्थ ब्लाॅकला जातात.


अर्थसंकल्पाची कागदपत्रं लेदर ब्रिफकेसमध्ये आणली जातात. ही पद्धत ब्रिटिशांपासूनची आहेत. त्या काळात ग्लेडस्टोन बाॅक्समध्ये ती आणली जायची.


1999च्या आधी फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर व्हायचा. यशवंत सिन्हा यांनी त्याची वेळ सकाळी 11वाजता केली. 2016मध्ये तारीखही बदलली. अरुण जेटलींंनी 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं. ( फोटो सौजन्य - पीटीआय)