World Snake Day: हा निळ्या डोळ्यांचा विषारी नाग बघून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा Photos
16 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय सर्पदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मध्यप्रदेशात आढळणाऱ्या रसल वाईपर जातीच्या नागाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. अत्यंत विषारी असणाऱ्या या सापाचे फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की याचे डोळे निळेभोर आहेत.
रसल वाईपर हा देखणा साप मानला जातो. अत्यंत दुर्मिळ असणारी ही प्रजाती नुकतीच मध्यप्रदेशात आढळून आली आहे. सर्पमित्रांनी काढलेल्या फोटोत त्याचे निळे डोळे अत्यंत आकर्षक असल्याचं दिसतं
2/ 3
साधाणतः घनदाट जंगलात हे नाग आढळून येतात. त्यामुळे त्यांचे नीट फोटो कधीही बघता येत नाहीत. मात्र पहिल्यांदाच या नागाचे इतके जवळून फोटो घेतल्याचं सांगितलं जात आहे.
3/ 3
मानवी वस्तीत सापडलेल्या या विषारी नागाला सुरक्षितरित्या जंगलात सोडून देण्यात आलं आहे.