याप्रकरणी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजदीपसिंग जडेजा यांनी सांगितलं की, पंचमहाल पोलिसांनी गुरुवारी रात्री पावागड शहरालगत असलेल्या एका रिसॉर्टवर छापेमारी केली. या कारवाईत आमदार केसरीसिंग सोलंकी यांच्यासह 25 जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.