

बिमन दास या अवलियाचे नाव "इंडिआ बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदवण्यात आले आहे. बॉलपेनच्या 'डॉट ड्रॉइंग' या कलेमुळे त्यांनी वाहवा मिळवली आहे.


पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील इचापूर गावात राहणारे बिमन यांनी आर्ट कॉलेमधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. व्यवसायाने देखील ते चित्रकार आहेत.


पारंपारिक शैलीच्या बाहेर काम करण्याची त्यांच्या आवडीमुळे त्यांचे नाव आज "इंडिआ बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये आहे. पण चित्र रेखाटताना ते लाइन्सचा वापर न करता बिंदूंचा वापर करतात. आणि त्यामुळेच त्यांची वेगळी शैली दिसून येते.


त्यांनी आतापर्यत विराट कोहली ते सौरव गांगुली, उत्तम ते सुचित्रा, रविंद्रनाथ टागोर ते मदर तेरेसा यांची 'बिंदू चित्र' रेखाटली आहेत.


त्यांनी जगभरातील खेळाडू, सेलिब्रिटी आणि राजकारण्यांची भन्नाट चित्रे रेखाटली आहेत. त्यांचे सुभाष चंद्र बोस यांचे हे चित्र तर अत्यंत बोलके आहे.


ही चित्रे रेखाटताना बिमन केवळ बॉलपॉईंट पेनाचा वापर करतात. एक चित्र पूर्ण होण्यास साधारण 3 ते 4 दिवस जातात. 2004 पासून त्यांनी अशाप्रकारची चित्रे रेखाटली आहेत. मात्र आतापर्यंत ती एकत्र करून ठेवली नव्हती.


मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या कलेचे प्रदर्शन आयोजित केल्यानंतर, याबाबतची त्यांची उत्सुकता अधिक वाढली. लॉकडाऊन काळात त्यांनी आतापर्यंत 70 चित्रे काढली आहेत.


'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ला त्यांच्या बद्दल इंटरनेटच्या माध्यमातून माहित झाले. त्यांच्याशी चौकशी केल्यानंतर बिमन यांनी त्यांची चित्रे 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ला पाठवली.


बिमन दास यांनी त्यांचे नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांना त्यांचे नाव लवकरच लिमका आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवायचे आहे.