10 नोव्हेंबर हा दिवस आरजेडी नेता आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासाठी खास आहे. 11 वर्षांपूर्वी त्यंनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता, आज त्यांच्याकडे अनेकजण भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत. आजचा दिवस बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये सध्या 'काँटे की टक्कर' सुरू आहे. त्यामुळे आज तेजस्वी यादव यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का याबाबत लवकरच खुलासा होणार आहे.
तेजस्वी यादव यांनी 10 नोव्हेंबर 2009 मध्ये एमएस धोनीची टीम झारखंडमधून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. 10 ते 13 नोव्हेंबरपर्यंत त्यांनी रणजी ट्रॉफीच्या प्लेट लीगमध्ये विदर्भाविरोधात केवळ एक फर्स्ट क्लास सामना खेळळा होता. त्या सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये तेजस्वी यादव यांनी केवळ एक रन केला होता आणि LBW आऊट झाले होते.