संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 5 खासदारांना कोरोनाची लागण, सर्वांना COVID-19 टेस्ट नंतरच प्रवेश
संसद भवनाचा परिसर सॅनिटाइज करण्यात आला असून खासदारांनी काय काळजी घ्यावी याची नियमावली देण्यात आली आहे.
|
1/ 9
संसदेच्या अधिवेशनाला सोमवारपासून (14 सप्टेंबर) सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे.
2/ 9
या चाचणीत 5 खासदार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी होणार आहे.
3/ 9
कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत.
4/ 9
खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदलली असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
5/ 9
अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अजुन मिळालेले नाही अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली आहे.
6/ 9
संसदेत दररोज फक्त 4 तास कामकाज होणार आहे. जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही Online पद्धतीनेच दिली जाणार आहेत.
7/ 9
संसंद भवनाचा परिसर सॅनिटाइज करण्यात आला असून खासदारांनी काय काळजी घ्यावी याची नियमावली देण्यात आली आहे.
8/ 9
दोनही सभागृहांचं आतूनही सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे.
9/ 9
गर्दी टाळण्यासाठी यावेळी पहिल्यांदाच नागरीकांना प्रवेश देण्यात येणार नाही.