तुमची शक्ती तुम्हाला मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संकेत देते का? असा प्रश्न बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. प्रायः राष्ट्र हितैषी, विश्व हितैषी संकेतांचा अनुभव असतो. यासाठी मंगल कामना करतो, पण अशा घटनांची माहिती होणं वेगळं आहे आणि त्या टाळणं खूपच वेगळं आहे. भगवान श्रीकृष्णालाही महाभारत होणार हे माहिती होतं, पण त्यालाही युद्ध टाळता आलं नाही, असं पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं.
ओडिशामध्ये 2 जूनला शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट आणि एका मालगाडीचा अपघात झाला. बालासोरमध्ये झालेल्या या अपघातामध्ये 288 जणांचा मृत्यू झाला आणि 900 पेक्षा जास्त जण जखमी झाले. त्यावेळी बागेश्वर धाम यांनी ट्वीटरवर अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं होतं. मृतकांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, तसंच जखमींना लवकरात लवकर बरं करावं, अशी प्रार्थना सरकारकडे करतो, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.
आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेहांना त्यांच्या नातेवाईकांकडे पोहोचवण्यासाठी दुसऱ्या गाड्यांची सोय केली जात आहे. मृतदेहांना त्यांच्या नातेवाईकांकडे पोहोचवण्यासाठी ओडिशा सरकारकडून नि:शुल्क परिवहन सेवा देण्यात आली आहे. राज्य सरकारला प्रत्येक मृतदेहाची ओळख पटवायची आहे, कारण त्यांच्यावर कुटुंबाकडून अंत्यसंस्कार व्हावेत, असं ओडिशा सरकारकडून सांगण्यात आलं आहे.