राममंदिराच्या देणगी अभियानाला प्रारंभ; राष्ट्रपतींनी दिली 5 लाखांची देणगी, तर हिरे व्यापाऱ्याने ओतले 11 कोटी
आयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram mandir) लोक सहभागातूनच उभारण्यात येणार आहे. राम मंदिरांच्या देगणीसाठी 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभर अभियान राबवण्यात येणार आहे.


अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कार्याला आता गती मिळाली आहे. आयोध्येतील राम मंदिर लोक सहभागातूनच उभारण्यात येणार आहे. राम मंदिरांच्या देगणीसाठी 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभर अभियान राबवण्यात येणार आहे. 15 जानेवारीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील 10 हजार गावं, 50 लाख कुटुंबापर्यंत रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे स्वयंसेवक पोहोचणार आहेत.


15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभरात राम मंदिरासाठी देणगी अभियान राबवण्यात येणार आहेत. त्यात दीड लाख स्वयंसेवक सहभागी होणार असून 1000 , 100, 10 रुपयांची कुपन्स देणार आहेत. शिवाय जे देणगीदार 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देईल, त्यांना पावती देण्यात येणार आहे.


मुख्य मंदिरासाठी एकूण 300 कोटी खर्च येणार आहे, तर संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी 1100 कोटी खर्च अपेक्षीत आहे.


आज पासून राम मंदिराच्या वर्गणी अभियानाला सुरुवात झाली असून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 5 लाख रुपयांची देणगी दान केली आहे.


या धार्मिक कार्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही देणगी दिली आहे. त्यांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र निधी समिती अंतर्गत असणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री विनायक राव देशमुख यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.