

भारतीय जनमानसावर ज्यांनी आपला प्रभाव टाकला अशा राजकारण्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं स्थान अग्रक्रमांकावर आहे.


मध्यप्रदेशातल्या ग्वाल्हेर इथं 25 डिसेंबर 1924 रोजी अटलजींचा जन्म झाला. आग्र्या जवळचं बटेश्वर हे त्यांचं मुळ गाव.


कृष्ण बिहारी वाजपेयी आणि कृष्णा देवी यांच्या सात मुलांमधले अटलजी हे एक पुत्र. अटलजी लहानपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते.


तरूण वयात असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्याचं नातं जुळलं. ते संघाचे प्रचारक झाले. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरूजी आणि बाळासाहेब देवरस यांचा त्यांच्यावर प्रभाव होता.


अटलजी राजकीय नेत्यांशीवाय पत्रकार, कवी, लेखक आणि उत्तम वक्ता होते. त्याचं 'मेरी ऐक्क्यांवन कविताएँ' हे पुस्तक त्यांच्यातल्या उत्तुंग कवीची साक्ष देतं.


सर्वांवर मोहिनी घालणारं अटलजींचं वक्तृत्व होतं. संसदेतलं अटलजींचं भाषण ऐकून पहिले पंतप्रधान पंडित नेहरूही प्रभावित झाले होते.


अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचं सरकार फक्त 13 दिवस टिकलं होतं.


राजकारणापलीकडे जाऊन अटलजींचा सर्वच पक्षांमधल्या नेत्यांची मैत्री होती. त्यामुळेच त्यांना अजातशत्रू व्यक्तिमत्व असंही म्हटलं जातं असे.


अटलजी आणि लालकृष्ण अडवानी यांची 1951 मध्ये पहिल्यांदा भेट झाली. त्यांची ही मैत्री अटलजींच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम होती.


लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांच्याशी त्यांचं विशेष नातं होतं. त्यामुळेच भाजपा के तीन धरोहर, अटल आडवाणी मुरली मनोहर असा नारा प्रसिद्ध झाला.