Assam Earthquake: पुन्हा एकदा हादरलं आसाम! एकापाठोपाठ जाणवले 3 भूकंपाचे धक्के
1950 मध्ये आसामध्ये सर्वात मोठा भूकंप झाला होता. हा भूकंप 8.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. त्यानंतरचा सर्वात मोठा भूकंप 28 एप्रिल 2021 रोजी आसामने अनुभवला आहे
|
1/ 6
बुधवारी सकाळी 7.51 वाजण्याच्या सुमारास रिश्टर स्केलवर 6.4 मॅग्निट्यूड तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने आसाम आणि उत्तर बंगालच्या काही भाग हादरला आहे. यामुळे पहाटे साखरझोपेत असणाऱ्या आसामला मोठा धक्का बसला आहे.
2/ 6
मेघालयातही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. पण आसाममध्ये या हादऱ्याची तीव्रता सर्वाधिक होती
3/ 6
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या (National Center for Seismology) माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा राज्यातील सोनीतपूरमध्ये होता. 17 कि.मी. परिसरात भुकंपाचे धक्के जाणवले
4/ 6
काही अहवालांनुसार याठिकाणी तेजपूर परिसरात देखील धक्के जाणवले. आसाममध्ये झालेल्या भुकंपाचे एकूण तीन हादजे जाणवले. पहिला 6.4 मॅग्निट्यूड, दुसरा 4.3 आणि तिसरा 4.4 मॅग्निट्यूडचा होता.
5/ 6
भूकंपाच्या तीव्र झटक्यामुळे अनेक भागात भिंती कोसळल्या आहेत. त्याच बरोबर अनेक ठिकाणी झाडेही कोसळली आहेत. भूकंपामुळे बरेच नुकसान झाल्याची माहिती आहे.
6/ 6
भूकंपाच्या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ झाला होता. अनेक इमारतींच्या भींतींना मोठे तडे गेल्याचंही चित्र पाहायला मिळतं आहे