वृद्ध महिलेची अवस्था बिकट होती. तिला व्हिलचेअरवर बसताही येत नव्हतं. या महिलेच्या मुलाने स्ट्रेचरची व्यवस्था करून तिला ताजमहाल परिसरात आणललं. त्यावेळी ताजमहाल एंट्री पॉइंटवर सीआयएसएफच्या जवानांनी सुरक्षेचं कारण देऊन त्यांना अडवलं. पण ही माहिती एएसआय अधिकाऱ्यांना कळाली. वृद्ध महिलेची इच्छा ऐकून त्यांनी तिला परवानगी दिली.