

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानाला चोख उत्तर दिलंय. 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 3.30 वाजता 12 मिराज-2000 लढाऊ विमानांनी दहशतवादी कँपवर बाॅम्बहल्ला केला.


भारताची सैन्य शक्ती वाढतेय. भारत जागतिक शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. पाहा त्याचे काही फोटो ( फोटो संपर्क - Getty Images )


Su-30Mki: Su-30Mki हे वायुसेनेचं असं लढाऊ विमान आहे जे 21व्या शतकाच्या गरजेनुसार बनवलंय. रशियामध्ये तयार झालेलं सुखोई-30 जेट फाइटर हे सर्वात प्रभावी लढाऊ विमान मानलं जातं. याची लांबी 21.93 मीटर आहे, तर रुंदी 14.7 मीटर आहे. याचं हत्यारांशिवायचं वजन 18 हजार 400 कि.ग्रॅम आहे. यात हत्यारं टाकली तर वजन 26 हजार कि.ग्रॅम होतं. याचा वेग 2100 किमी. प्रति तास आहे. कितीही प्रतिकुल हवामानात हे लढाऊ विमान काम करतं.


ब्रह्मोस मिसाइलची निर्मिती भारत आणि रशियानं मिळून केली. या मल्टिमिशन मिसाइलची मारक क्षमता 290 कि.मी. आहे. मिसाइलची गती ध्वनीपेक्षा तिप्पट आहे. हे मिसाइल जमीन, समुद्र, हवा कुठेही जाऊ शकतं. हे मिसाइल डोंगराच्या मागे लपलेल्या लक्ष्यावर हल्ला करू शकतं. ब्रम्होस्त्र एअर फायटरची सुखोई-30 एमकेआई फाइटरवरून उडाणाची टेस्ट केली जातेय.


आईएएनएस चक्र-2 ही पाणबुडी नौदलाचं मोठं शस्त्र आहे. ही पाणबुडी 600 मीटर पाण्याखाली राहते. तीन दिवस ती पाण्याखाली राहू शकते.


अवॉक्सः ‘एयरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम’ (अवॉक्स) आकाशात 400 किलेमीटरच्या वर काही धोका आहे का, हे पाहू शकतं.


INS विक्रमादित्यः 44,500 टनाचं विमान 2013मध्ये नौदलात सामील झालं. याची लांबी 283.1 मीटर आणि उंची 60.0 मीटर आहे. यावर 22 डेक आहेत. तीन फुटबाॅल मैदानाएवढं या विमानाचं क्षेत्रफळ आहे. यात 1600 लोकांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. हे 100 दिवस सलग समुद्रात राहू शकतं.


टी 90, भीष्मः हा रणगाडा ब्रम्हास्त्रसारखा आहे. पाच किमीपर्यंत हा रणगाडा हल्ला करू शकतो. यावर केमिकल किंवा बायोलाॅजिकल हल्ल्याचा परिणाम होत नाही. यातले सैनिक सुरक्षित राहू शकतात.


पी 81 नेप्ट्यूनः भारताची 7500लांब सीमारेखा फक्त बर्फाळ भागातली आहे. तिचं रक्षण करण्यासाठी याची निर्मिती केलीय. 4 तास हवेत उडू शकतं. पाणबुडीचाही शोध घेऊ शकतं. हे सर्वात लांबवर काम करणारं रडार आहे.


नामिका (नाग मिसाइल कॅरियर): हे मिसाइल टॉपअॅटॅक- फायर अँड फोरगेट आणि सर्व मोसमात काम करू शकतं. हलक्या वजनाच्या हेलिकाॅप्टरलाही हे लावता येतं.


PAD/ AAD बैलेस्टिक मिसाइल डिफेंस (BMD) सिस्टमः अत्यंत कमी अवधीत हे मिसाइल सुरक्षेसाठी तयार होऊ शकतं. PAD 2 हजार किमीपर्यंत मारा करू शकतं. यात इंटरसेप्टर मिसाइल, PAD (पृथ्वी एयर डिफेंस) और AAD (एडवांस एयर डिफेंस) समाविष्ट आहेत.


पिनाका एमएलआरः याचं काम तोफांच्या 30 किमीबाहेरचं लक्ष्य साधणं. छोट्या युद्धांमध्ये याचा वापर होतो.