अहमदाबाद, 17 नोव्हेंबर: गुजरातमधील अहमदाबादमध्ये मंगळवारपासून महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या कडेला असलेली मांसाहारी पदार्थांची दुकानं हटवण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटरच्या परिघात असणारे हे स्टॉल्स, गाड्या, दुकानं पालिका हटवत आहे. महापालिकेने ही मोहीम सुरू करताच हे विक्रेते चिंतेत पडले आहेत.
मंगळवारी अहमदाबाद महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने रस्त्यांच्या कडेला असलेली मांसाहारी पदार्थांची दुकानं हटवण्याचं काम सुरू झाले आहे. (फोटो- एएनआय)
2/ 5
महापालिकेचे कर्मचारी मंगळवारपासून हमदाबादच्या रस्त्यावर उतरले आणि असे स्टॉल्स ट्रकमध्ये टाकून कार्यालयात घेऊन जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही दुकानं जप्त करण्यात आली आहेत. (फोटो- एएनआय)
3/ 5
एग सेंटरच्या हातगाड्या देखील लवकरच जप्त केल्या जाणार असल्याची माहिती मिळते आहे. (फोटो- एएनआय)
4/ 5
अहमदाबादच्या रस्त्यावर मांसाहार विकणारा एक विक्रेता राकेश याने या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. तो म्हणतो की, आमची दुकाने बंद ठेवावीत आणि हॉटेल्स सुरू ठेवावीत, हे योग्य नाही. आमच्या दुकानातून तर मांसाहाराचा वासही पसरत नाही. (फोटो- एएनआय)
5/ 5
नगररचना समितीचे अध्यक्ष देवांग दाणी यांनी सांगितले की, मुख्य रस्त्यांवरील अंडी आणि मांसाची दुकाने तपासून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते काढण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. (फोटो- एएनआय)