Home » photogallery » national » ADMIRABLE NEWBORN BABY AND MOTHER SAFELY AT HOME ON THE INITIATIVE OF THE JAWANS YOU TOO WILL SALUTE AFTER WATCHING THE VIDEO MHMG
कौतुकास्पद! जवानांच्या पुढाकाराने नवजात बाळ व आई सुखरुप घरी; VIDEO पाहून तुम्हीही कराल सॅल्यूट!
केवळ सीमेवरच नाही तर अडचणीत सापडलेल्या सर्वांसाठी भारतीय आर्मी कायम तत्पर असते
|
1/ 5
जम्मू-काश्मीरमधून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. भारतीय आर्मी सीमेवर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता भारतीयाचं रक्षण करते. इतकच नाही तर अडचणीत सापडलेल्या भारतीयांसाठीही भारतीय आर्मी कायम पाठिशी उभी राहते हे या व्हिडीओमधून दिसून येते.
2/ 5
जम्मू काश्मीरमधील सोगम भागातील एका रुग्णालयात गर्भवती महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. घरातल्यांना याचा खूप आनंद झाला होता. दरम्यान गर्भवती महिलेला घरी पोहोचवायला जवानांनी खूप मदत केली.
3/ 5
जम्मू-काश्मीरमध्ये स्नो फॉल झाल्याकारणाने रस्त्यांवर बर्फ जमा झाला आहे. अशावेळी रुग्णालयातू महिलेच्या घरापर्यंत कोणतीही गाडी जाणं अवघड आहे. शिवाय प्रसुतीनंतर महिला अशक्त असल्याने ती हा प्रवास चालत करू शकत नव्हती.
4/ 5
अशावेळी भारतीय जवान महिलेला स्ट्रेचरवरुन तिच्या घरापर्यंत घेऊन गेले. 28RR च्या जवानांनी आई व नवजात बाळाला सुखरुप घरापर्यंत पोहोचवलं.
5/ 5
भारतीय जवानांनी केलेल्या या कामाचं स्थानिकांकडून खूप कौतुक केलं जात आहे. महिलेचा पती व त्यांच्या कुटुंबीयांनी भारतीय जवानांचे धन्यवाद व्यक्त केले. अशा कठीण प्रसंगात जवानांनी जे केलं ते खूप मोलाचं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.