Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 3


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर बांधणं, त्यांची पूजा करणं किंवा त्यांची एखादी मुर्ती तयार करणं, हे देशासाठी आता नवं नाही. देशभरातील त्यांच्या अनुयायांनी अनेकदा अशाप्रकारचे प्रयोग करून नरेंद्र मोदी यांच्या कामाचा गौरव केला आहे. पण ओडिशा राज्यातील एका तरुणाने मात्र थोडीशी वेगळी कल्पना लढवली आहे. त्यानं चक्क झाडाच्या बुंद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र कोरलं आहे.
2/ 3


ओडिशा राज्यातील मयुरभंज येथील सिमिलीपाल नॅशनल पार्क मधील झाडांच्या बुद्यांवर हे चित्र रेखाटलं आहे. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे झाडावर नरेंद्र मोदी यांचं चित्र कोरलं आहे. परदेशात अनेकदा आपल्याला अशाप्रकारची कला पाहायला मिळते. तेथिल कलावर झाडावर अनेक प्रकारची चित्र काढून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात.