व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणीचा गेला तोल, पुलावरून कोसळून जागीच ठार!
काही लोकांनी एका तरुणीला पुलावर (Bridge) फिरताना आणि नंतर अचानक खाली पडताना पाहिलं. त्यानंतर त्वरित पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. आधार कार्डवरून तरुणीची ओळख करण्यात आली आहे.
|
1/ 5
गुरुवारी एक तरूणी मोबाईलवरुन व्हिडीओ कॉल करत असतानाच, रेल्वे स्टेशन समोर असलेल्या पुलावरुन खाली पडली. जवळपास 30 फूटांच्या उंचीवरुन खाली पडल्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
2/ 5
हरिणाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शाहाबादमध्ये रेल्वे स्टेशनसमोरील जीटी रोडवर तरूणी पुलावरुन खाली पडली. तरुणीच्या मोबाईल आणि बॅगमध्ये मिळालेल्या आधार कार्डमुळे तरुणीची ओळख पटली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
3/ 5
प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी पुलावर उभी होती. तरुणीच्या हातात मोबाईल होतात. त्यावर ती व्हिडीओ बनवत होती. त्याचवेळी तिने पुलावरुन खाली उडी मारली. तिच्या डोक्याला गंभीर ईजा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
4/ 5
तरुणीचा मोबाईल रस्त्यावर पडला होता. लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती देऊन, तिचा फोनही ताब्यात दिला. पोलिसांनी मोबाईल आणि बॅग ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
5/ 5
तरुणीने मोबाईलवरून शेवटच्या नंबरवर फोन केलेल्या संबंधित व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आहे. तसंच तरुणीच्या कुटुंबियांनाही याबाबत कळवण्यात आलं आहे.