जगातील सर्वात विषारी सापांमध्ये गणला जाणारा कोब्रा साप एका शाळेत घुसला. 4 फूट लांब असलेल्या या कोब्राला पाहून लोकांची पळता भुई थोडी झाली. आरसी आरएस नावाच्या सर्पमित्रांच्या टीमने या विषारी सापाची सुखरुप सुटका केली आहे. ही घटना छत्तीसगड जिल्ह्यातील कोरबा जिल्ह्यातील एका सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील आहे.
हे सर्पमित्र वेळेत आल्याने या सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आलं आहे. त्यानंतर या सापाला जंगलात सोडून देण्यात आलं. सापाला सुरक्षितपणे पकडल्यामुळे शाळेच्या आवारात राहणाऱ्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या टीमने आतापर्यंत जिल्हात दहा हजाराहून अधिक सापांना पकडून त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडलं आहे.