मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » OMG : देशातील या रेल्वेलाईनजवळ उभी केली जातेय 200km ची भिंत, पाहा PHOTOS

OMG : देशातील या रेल्वेलाईनजवळ उभी केली जातेय 200km ची भिंत, पाहा PHOTOS

बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये रेल्वे आणि रस्ते क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासाची विविध कामं केली जात आहेत. त्यात द्रुतगती मार्ग, चौपदरीकरणापासून ते रेल्वेच्या विद्युतीकरणापर्यंतचा समावेश आहे. रेल्वे रुळ बदलण्यापासून ते स्थानकांपर्यंत सर्व सुविधा तयार केल्या जात आहेत. रेल्वेच्या विकासकामांच्या या क्रमवारीत तीन वर्षांपूर्वी केलेल्या आराखड्यालाही आकार दिला जात आहे. या योजनेंतर्गत झारखंड ते बिहारपर्यंत विस्तारलेल्या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला सुमारे 200 किमी उंच भिंत उभारली जात आहे. त्यासाठी रेल्वेच्या विभागाने जमिनीच्या मोजमापासह खांब उभारण्याचे काम सुरू केलं आहे.