धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे प्रशिक्षण देणारे विमान कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे विमान कोसळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
2/ 5
ही घटना दुपारी दोन दरम्यान घडली असून या विमानातील महिला प्रशिक्षणार्थीचा जीव वाचल्याचं सांगितलं जात आहे.
3/ 5
चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताला लागून असलेल्या या भागात 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात हा अपघात घडला.
4/ 5
वर्डीपासून दहा किलोमीटर अंतरावर ध्वज बल्ली नावाच्या डोंगरावर विमान धडकल्याने अपघात झाला आहे. आदिवासींनी विमानातील दोन जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक महिला प्रशिक्षक जिवंत असल्याचं दिसतं. या अपघातात विमानातील पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
5/ 5
सदर विमान दरी-खोऱ्यांमध्ये कोसळले. या परिसरात पाड्यातील आदिवासींनी हा अपघात पाहिल्यानंतर ते धाव घटनास्थळी पोहोचले.