नाशिकमधील छापखान्यातून 5 लाख गायब कसे झाले? पोलिसांनी शोधलं उत्तर, पाहा ऐतिहासिक Photos
नाशिकच्या छापखान्यातून फेब्रुवारी महिन्यात 5 लाख रुपये गायब झाले होते. त्यानंतर याची पोलीस चौकशी झाली. शेवटी हे सिद्ध झालं की पंचिंग प्रोसेसमध्ये गडबड झाल्यामुळे नोटांचा हिशेब चुकला होता.
नाशिकच्या छापखान्यात दोन विभाग आहेत. एका विभागात नोटा छापल्या जातात, तर दुसऱ्या विभागात स्टँप पेपर, रेव्हेन्यु तिकीटे, पासपोर्ट, व्हिसा या गोष्टी छापल्या जातात.
2/ 9
नाशिकचा हा छापखाना आर्थिक राजधानी मुंबईपासून 188 किलोमीटर अंतरावर आहे. 1928 साली ब्रिटीशांनी नाशिकमध्येच नोटा छापण्याचं मशीन लावलं होतं. तेव्हापासून नाशिकचा आणि नोट छपाईचा संबंध आहे. नाशिकमध्ये एकेेकाळी नेपाळ, भूतान, बांगलादेश, ईस्ट अफ्रिका आणि इराक या देशांच्याही नोटा छापल्या जात असत.
3/ 9
नाशिकच्या छापखान्याचा परिसर 14 एकरचा आहे. इथं हाय सिक्युरिटी प्रिंटिंग कॉम्प्लेक्सदेखील आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा याच्या आतमध्ये मिळतात. कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर जाण्याची गरज लागत नाही.
4/ 9
नोटांचं डिझाईन, छपाई, ऑफसेट प्रिंटिंग, समग्र प्रिटिंग हे सर्व याच ठिकाणी करण्यात येतं.
5/ 9
नोटा छापण्याच्या तंत्रात झालेले प्रत्येक बदल नाशिकच्या कारखान्यातही केले जातात. सध्या इथं अशणारी यंत्र अद्ययावत असून जगातील नोटा छापण्याची अद्ययावत तंत्रज्ञान त्यासाठी वापरलं जातं.
6/ 9
नोटाबंदीनंतर देशात सर्वाधिक नोटा नाशिकमध्ये छापल्या गेल्या आहेत. त्यावेळी इथं ओव्हरटाईम केलं जायचं आणि एका दिवसात नोटांचे 4 कोटी पीस छापले जायचे. इथं 10,20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात.
7/ 9
नाशिकमध्ये नोटा छापण्याच्या क्षमतेत सातत्यानं वाढच होत गेली आहे. इथल्या यंत्रांचं आता ऑटोनेशन झालं आहे.
8/ 9
हे सर्वात जुनं चित्र आहे. नोटा छापणं आणि त्या पेपरमध्ये स्टोअर करणं ही प्रक्रिया या फोटोत दिसते. इथं नोटा आणि स्टँप पेपर दोन्हींची छपाई जुन्या काळातही केली जात असे.
9/ 9
हा परिसर हाय सिक्युरीटी झोनमध्ये मोडतो. इथं नेहमी सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्सचे जवान तैनात असतात.