Home » photogallery » nagpur » SUPER TIGRESS MOM T 15 WHO GAVE BIRTH 29 CUBS POPULARLY KNOWN AS COLLARWALI DIED AT PENCH TIGER RESERVE MHPR
Super Tigress: भारतातील 'सुपर टायग्रेस मॉम'चा मृत्यू! तिचा पराक्रम वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
Super Tigress Mom News: मध्य प्रदेशात वाघांची संख्या वाढवणाऱ्या T-15 कॉलर वाघिणीचा मृत्यू झाला. 'सुपर टायग्रेस मॉम' म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील या वाघिणीला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देण्यात आला. तिच्या अंत्यसंस्कारात राखीव दलाच्या अधिकाऱ्यांसह अनेकजण सहभागी झाले होते.
|
1/ 7
भारतातील 'सुपर टायग्रेस मॉम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेंच अभयारण्यातील 'कॉलरवाली' वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. या वाघिणीने तिच्या आयुष्यात एकूण 29 पिलांना जन्म दिला. त्यातली 25 पिल्ले म्हणजेच बछडे जगले.
2/ 7
'कॉलरवाली' 16 वर्षांची होती, साधारणपणे वाघ 12 वर्षे जगतात. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार तिचे अंतिम विधी करण्यात आले, हे पाहताना अनेकांचे डोळे नकळत पाणावतांना दिसत होते.
3/ 7
या घटनेने मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात शोककळा पसरली आहे. तिला T-15 'कॉलर' वाघीण असेही म्हटले जाते.
4/ 7
ही वाघीण गेल्या चार दिवसांपासून आजारी होती. तिच्या निधनाची बातमी तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचताच त्यांना धक्काच बसला. त्यानंतर तिला आदरपूर्वक निरोप देण्यात आला.
5/ 7
6/ 7
8 वेळा 29 बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम या वाघिणीच्या नावावर आहे. एवढेच नाही तर पेंच व्याघ्र प्रकल्पात आणि संपूर्ण राज्यात वाघांची संख्या वाढवण्यात या वाघिणीचे महत्त्वाचे योगदान आहे.
7/ 7
वन्यजीवांमध्ये स्वारस्य असलेले देशातील आणि जगातील बरेच लोक तिला टी-15 'कॉलर' वाघिणी म्हणून ओळखतात. तिचा शेवटचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये ती खूपच कमकुवत दिसत आहे.