Home » photogallery » nagpur » ACTIVISTS NITIN GADKARI WHEN THE UNION MINISTER GETS OUT OF THE CAR AND TAKES THE INITIATIVE TO SOLVE THE TRAFFIC JAM MHMG
कार्यकर्ते नितीन गडकरी! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री गाडीतून उतरून पुढाकार घेतात तेव्हा...
भाजपचं काय पण विरोधी पक्षातील नेतेही गडकरींच्या कामाचं कौतुक करताना मागे-पुढे पाहत नाही.
|
1/ 4
अत्यंत प्रामाणिक आणि सतत राज्य, देशाच्या विकासाचा विचार करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरी यांचं नाव घेतलं जातं.
2/ 4
अगदी विरोधी पक्षातील नेतेदेखील नितीन गडकरींचं नाव आदराने घेतात आणि त्यांच्या कामाचं कौतुकही करतात. त्याच्या कामाबरोबरच वागणुकीतील साधेपणाही सर्वांना अधिक भावतो.
3/ 4
नागपूरच्या पारडी भागात एका कार्यक्रमाला जात असताना निर्माणधीन पुलामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत: गाडीतून उतरले. केंद्रीय मंत्रीपदाचा आव न आणता ते गाडीतून उतरले आणि प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू लागले.
4/ 4
नितीन गडकरी स्वत: गाडीतून उतरले आणि वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना मदत केली. यावेळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची गडकरींनी समजूत काढली.