'या' मुद्द्यांमुळे मुंबईच्या महापौर अडकणार? भाजपची अविश्वास प्रस्तावाची तयारी जोरात
सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपनं आणखी कंबर कसली आहे. कोविड 19 च्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे.


मुंबईतील विविध विषयांवरुन महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास प्रस्ताव करणार आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. कोणते आहेत ते मुद्दे..पाहूया


मुंबईत अद्याप कोरोना रुग्णांवर नियंत्रणत आणण्यात यश आलेलं नाही. मुंबईतील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे तर मृत्यूदराचा आलेखही वाढता आहे.


RT-PCR चाचण्या वाढविण्यात आलं नाही. तर जेवणाचे चुकीचं 63 कोटीचे कंत्राट दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.


याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.


शिवसेनेचा अर्थसंकल्पातला वाटा 73 टक्के, भाजपचा 13 टक्के आहे. व्हीसीद्वारे फक्त स्वत:च्या सदस्यांना बोलू दिलं व त्यांच्यासमोर अर्थसंकल्प मंजूर केला. दुसरीकडे बेस्टची भरमसाठ बिलवाढ हा देखील मुद्दा त्यांच्या अविश्वास ठरावात नमूद करण्यात आला आहे.