महाराष्ट्रात काय आहे कोरोनाची स्थिती? जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यात आता रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा घरी जाणारे रुग्ण जास्त होते.
|
1/ 11
राज्यात 3 ऑगस्ट 2020 पर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 04 लाख 50 हजार 196 एवढी झाली आहे.
2/ 11
राज्यात Active रुग्णांची संख्या 1,47,018 एवढी झाली आहे.
3/ 11
राज्यात आत्तापर्यंत 15,842 जणांचा मृत्यू झाला आहे.
4/ 11
मुंबईत आज 46 जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 6493 जणांचा मृत्यू झाला आहे.
5/ 11
सोमवारी 3 ऑगस्टला राज्यात 266 जणांचा मृत्यू झाला आहे.
6/ 11
मुंबईत आजपर्यंत रुग्णांची एकूण संख्या 1,17,406 एवढी झाली आहे.
7/ 11
मुंबई 20,528 एवढे रुग्ण Active आहेत अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
8/ 11
सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असून 10,221 रुग्णांना घरी सोडण्यात आलंय. आत्तापर्यत 2,87,030 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
9/ 11
आत्तापर्यंत 22,98,723 चाचण्या करण्यात आल्यात. त्यात 4,50,196(19.58 टक्के) चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
10/ 11
राज्यात आत्तापर्यंत 9,40,486 जण होम क्वारंटाइन आहेत. तर 37,009 जणांना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
11/ 11
महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 63.76 एवढा झाला आहे. तर मृत्यू दर 3.52 एवढा आहे.