गेल्यावर्षी अशीच दिसली होती मायानगरी! मुंबईत कशाप्रकारे होतंय Weekend Lockdownचं पालन? पाहा Photos
Weekend Lockdown in Mahashtra: महाराष्ट्रात सोमवारी सकाळपर्यंत वीकेंड लॉकडाऊनचे पालन केले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाची साखळी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राज्याची राजधानी असणारी मुंबई या वीकेंड लॉकडाऊनमध्ये काहीशी थांबल्यासारखी भासत होती.
संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेलं हे लॉकडाऊन उद्या सोमवार सकाळपर्यंत सुरू असणार आहे.
2/ 23
मुंबईतही सलग दुसऱ्या दिवशी काटेकोरपणे लॉकडाऊनचं पालनं होत असल्याचं चित्र आहे. सीएसएमटी स्थानकाजवळील हे फोटो याचीच साक्ष देत आहेत.
3/ 23
नेहमी गजबजलेला असणारा सीएसएमटी स्थानकाजवळील हा परिसर आज भयाण शांतात अनुभवत होता.
4/ 23
मुंबईजवळच असणाऱ्या खारघर परिसरातील ही दृश्य आहेत. याठिकाणीही स्थानिकांनी कडकडीत लॉकडाऊन पाळला आहे (खारघर)
5/ 23
साधारणत: रविवारी या परिसरात खरेदीसाठी गर्दी होते, मात्र आज लॉकडाऊनमुळे इथे शांतता होती. (खारघर)
6/ 23
डीमार्टसारखे मोठे सुपरमार्केट देखील बंद आहेत. लोकांनी या लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतं आहे. (खारघर)
7/ 23
खारघर
8/ 23
दुकानदार आणि नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत होईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. (खारघर)
9/ 23
खारघर
10/ 23
मुंबईतील भांडुप स्थानकातील हा फोटो, लोकलने प्रवास करण्यासाठी नियमात शिथिलता दिल्यानंतर मुंबईतील स्थानकांमध्ये पुन्हा गर्दी वाढू लागली होती. पण शनिवारपासून स्थानकांमध्ये पुन्हा एकदा गर्दी कमी झाली आहे
11/ 23
कोरोनाबाबतच्या नियमावलीचे पालन देखील काही भागात होताना दिसत आहे. मात्र काही भागात अद्याप लोकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले नाही आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे
12/ 23
गेल्यावर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा मुंबईचे रस्ते सामसूम दिसत आहेत.
13/ 23
लॉकडाऊनला प्रतिसाद देण्यासाठी मुंबईतील छोट्या व्यावसायिकांनी देखील दुकानं बंद ठेवली आहेत. मुंबईतील विविध भागात आज Shutter Down पाहायला मिळालं
14/ 23
मुंबई 11 एप्रिल 2021
15/ 23
व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला निषेध केला असला तरीही मुंबईतील दुकानं आज बंदच ठेवण्यात आली आहे. भांडुप परिसरात लावण्यात आलेला हा निषेधाचा फलक
16/ 23
मुंबईतील विविध भागात हातावर पोट असणारे छोटामोठा व्यवसाय करून प्रत्येक दिवस पुढे ढकलत असतात. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता असली तरी या माणसांचे हाल होतायंत हे मात्र निश्चित.
17/ 23
खारघरमधील रस्त्यावर चिटपाखरूही पाहायला मिळत नाही आहे
18/ 23
मध्येच काही वेळाने याठिकाणी एखाद दुसरी गाडी जाताना पाहायला मिळते आहे (खारघर)
19/ 23
खारघर
20/ 23
रस्त्याच्या दुतर्फा याठिकाणी अजिबात वर्दळ दिसत नाही आहे (खारघर)
21/ 23
खारघर पोलिसांनी विविध भागात रस्त्यावर गर्दी होऊ नये याकरता बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले होते
22/ 23
मुंबई गोवा/पुणे महामार्गावर देखील अत्यल्प गाड्या दिसल्या
23/ 23
त्याचप्रमाणे पोलिसांच्या बंदोबस्तात लॉकडाऊनचं पालन करण्यात येत होते