दहिसर चेकनाक्यावर आज सकाळपासूनच वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
3/ 8
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीची परवानगी आली आहे.
4/ 8
अत्यावश्यक सेवेत सहभागी नसणाऱ्या अन्यथा वाहनांना आणि प्रवाशांना पोलिसांकडून तपासणीनंतर परत पाठवलं जातं आहे.
5/ 8
पोलिसांच्या या तपासणीमुळे जवळपास साडेतीन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
6/ 8
दरम्यान, पोलिसांकडून मुंबईत पूर्व महामार्ग , पश्चिम महामार्ग, सायन पनवेल हायवे, नरिमन पॉईंट, जे जे फ्लाय ओव्हर, हज हाऊस याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला आहे.
7/ 8
15 दिवस कडक निर्बंध असल्याने ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
8/ 8
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंधाबाबत प्रशासनाचे सर्व गैरसमज दूर केले. तसंच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.