सर्व देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आला कमी होत आहे. सलग गेल्या महिनाभरापासून आलेख उतरणीला लागला आहे. शहरातला रुग्ण वाढीला दर आता तब्बल 157 दिवसांवर गेला असून कोविड प्रसाराचं प्रमाण हे 0.44 टक्के एवढं असल्याचं BMCने म्हटलं आहे. शुक्रवारी 1 हजार 101 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 2 लाख 27 हजार 142 एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 88 टक्के असूनसध्या 18 हजार 438 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दिवसभरात 1,145 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 2,56,507 एवढी झाली आहे. मुंबई शुक्रवारी 32 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूसंख्या ही 10,218वर गेली आहे. राज्यात शुक्रवारी 8,241 जणांनी कोरोनावर मात केली तर 6,190 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्याही 15,03,050 एवढी झालीय. तर रुग्णांची एकूण संख्या ही 16,72,858 एवढी झाली आहे. राज्यात 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा हा 43,837वर गेला आहे. राज्यात सध्या 1,25,418 जणांवर उपचार सुरू आहेत.