मुंबईला वादळानं झोडपलं; कुठे झाडं कोसळली तर कुठे पाणी तुंबलं, पाहा PHOTOS
Cyclone Tauktae Live Updates: मुंबईतील विविध भागात मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्ते पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरली आहेत.
मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौत्के चक्रीवादळ सध्या अतितीव्र होतं असून गुजरातच्या दिशेनं पुढे सरकत आहे. त्यामुळे मागील काही तासांपासून मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
2/ 9
मुंबईतील विविध भागात मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्ते पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरली आहेत.
3/ 9
चक्रीवादळाच्या वेगवान वाऱ्यामुळे मुंबईतील लोकल सेवा देखील ठप्प करण्यात आली आहे. पुढीत काही तास मुंबई जोरदार पावसाची शक्यत असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
4/ 9
आज मध्यरात्रीपर्यंत मुंबईत 120 किमी प्रतितास इतक्या वेगानं वारा वाहणार आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
5/ 9
मुंबईतील विविध भागात रस्त्यावर पडलेली झाडं हटवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारीही उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
6/ 9
जोरदार पावसामुळे मुंबईतील परेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. यामुळे याठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना दुसऱ्या मार्गानं जाण्यास सांगितलं जात आहे.
7/ 9
याशिवाय मालाडमधील भुयारी रस्ता पाण्यानं भरला असून नागरिकांनी संबंधित रस्त्यावरील प्रवास टाळावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
8/ 9
मुंबईतील सीपी टँक, चुन्नाभट्टी, गिरगाव परिसरातही झाडं उन्मळून पडली आहेत. येथील एका कारवर झाड कोसळल्यानं कारचं बरंच नुकसान झालं आहे.