येणार होते 'राजकुमार' पण आला 'सुलतान'!
सुलतान वाघ नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये जुलै 2018 मध्ये मुक्कामाला आला होता. त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी परिसरात २ नागरिकांचा बळी घेतल्यानंतर त्याला बंदीस्त करुन गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते. (सत्यम सिंग, प्रतिनिधी)


मुंबईतील बोरीवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गोरेवाडा रेस्क्यु सेंटरमधील सुलतान (सी-1) वाघाला आणत आले आहे. सुलतानचा उपयोग वाघांच्या प्रजनन वाढीसाठी केले जाणार आहे.


सुलतान वाघ नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये जुलै 2018 मध्ये मुक्कामाला आला होता. त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी परिसरात २ नागरिकांचा बळी घेतल्यानंतर त्याला बंदीस्त करुन गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते.


बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिजली आणि मस्तानी या वाघिणी जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहेत. सुल्तानला गुणसूत्र गुणधर्म (प्रजोत्पादन) बदलाकरिता रवाना करण्यात आले आहे.


त्यामुळे उद्यान प्रशासनाने नागपूरमधील गोरेवाड्यातील 'राजकुमार' या वाघाची मागणी केली होती. मात्र, गोरेवाडा प्रशासनाने राजकुमारऐवजी सुलतान वाघाला पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सुलतान बोरिवलीला पाठवण्यात आले.


वन परिसरातील वाघाच्या मदतीनं प्रजनन प्रक्रिया पार पाडल्यास त्याचा चांगला परिणाम होतो. गुणसूत्र बदलासाठी गोरेवाडा येथील सुलतान या वाघाला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले आहे. सुलतान या वाघाचा बोरिवली येथे व्याघ्र प्रजननासाठी उपयोग केला जाणार आहे.