5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.