मुंबईत पुढचे काही दिवस जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
2/ 7
मुंबईला यापूर्वी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र हवामानाची बदलती परिस्थिती पाहून हवामान खात्याने आता रेड अलर्ट जारी केला आहे.
3/ 7
गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
4/ 7
समुद्राच्या किनाऱ्यावरून जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून त्यामुळे किनारी भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी पर्यटकांनी जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला आहे.
5/ 7
गरज नसेल,तर मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये,असं आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
6/ 7
मुंबई लोकल सामान्यांसाठी बंद असल्यामुळे अगोदरच रस्त्यावर गर्दी होते. त्यात पावसामुळे जागोजागी पाणी साचून वाहतूक कोंडीची शक्यता आहे.
7/ 7
पुढले दोन ते दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टी भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.