राज ठाकरे टेनिस खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी शिवाजीपार्क परिसरात काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनीही कर्मचाऱ्यांच्या विनंतीला मान दिला आणि फोटो काढण्यासाठी पुढे आले. फोटो काढत असताना राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दिलखुलासपणे फोटो काढला.