विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत मीच मुख्यमंत्री असेन. त्यामुळं काळजी करू नका असं आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावर आता राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. परंतु देवेंद्रजी, पुन्हा लाट येईल असे वाटत नाही! असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं व्यंगचित्र रेखाटलं आहे.
मोहनजी, अगदी बरोबर सांगत आहात! आपण म्हणताय तेच आजपर्यंत आम्हाला 'शिकवलं' गेलं! मग या दोघांना नाही का ते 'शिकवलं' गेलं! असं म्हणत पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. मोहन भागवत यांनी सगळ्यांना शिकवलं पण त्यांनी मोदी आणि शहांना नाही शिकवलं. ते वर्गाबाहेरचे विद्यार्थी आहेत असं या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचं प्रसिद्धीविनायकाच्या रूपात असं व्यंगचित्र काढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित लघुपट शाळांमध्ये दाखवायचे आदेश दिल्याच्या बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांवरची प्रतिक्रिया म्हणून राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र रेखाटलं आहे. गणपतीच्या रूपातले मोदी दाखवतानाच त्यांनी गणरायाचं वाहन - उंदीर म्हणून अमित शहांना दाखवल्यामुळे हे व्यंगचित्र वादग्रस्त ठरतंय. राज ठाकरेंची याआधी काढलेली काही व्यंगचित्रंही खाली बघा.