

मुंबई, 5 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीवर गेले होते. या भेटीचे EXCLUSIVE फोटो समोर आले आहेत.


राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते.


राज ठाकरे आणि शिवसेनेचं नातं महाराष्ट्राला परिचित आहे. असं असताना कौटुंबिक कारणासाठी का होईना राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते.


दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत होते. पण या भेटीचे राजकीय अर्थ काढू नका असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.


सध्या अमित ठाकरेच्या लग्नाची गडबड आहे. या लग्नासाठी काही महत्त्वाच्या आणि मोजक्याच लोकांना आमंत्रण देणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


गेल्या काही दिवसांआधी राज ठाकरे हे त्यांच्या पत्नीसह सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते. यावेळी राज यांनी अमितच्या लग्नाची पत्रिका सिद्धीविनायकाच्या चरणी ठेवली.


राज यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडेचा मागील वर्षी 11 डिसेंबर 2017 रोजी साखरपुडा झाला होता. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर संपन्न झाला होता. आता अमित आणि मिताली हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर जरी पडले असले तरी आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी 'मातोश्री'वर त्यांचं वास्तव्य अबाधीत आहे.


राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्ष झाली. पण मातोश्रीवर त्यांच्या वास्तव्याच्या खानाखुणाआजही जशाच तशा आहे. मातोश्रीवर राज ठाकरे यांचे जुने फोटो आजही पाहण्यास मिळतात.


'मातोश्री'त प्रवेश केल्यानंतर समोरच डिजीटल स्क्रिनवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. या फोटोत बाळासाहेबांनी राज आणि उद्धव यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे.


एका जाहीर सभेतला हा फोटो आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे हे राज यांना काही सुचना देत आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करून खास मातोश्रीच्या भींतीवर लावण्यात आला आहे.


राज ठाकरे हे नेहमी बाळासाहेब जिथे जात होते तिथे त्यांच्यासोबत असत. असाच एक फोटो ज्यामध्ये सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यासह राज ठाकरे दिसत आहे.


असाच एक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला, या फोटोमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या फोटोसमोर बाळासाहेब आणि राज ठाकरे उभे आहे.


काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांची अॅजिओप्लास्टी झाली होती. तेव्हा राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना घरी सोडण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.


त्यानंतर ऑक्टोबर 2012 नंतर उद्धव ठाकरे यांच्या अॅजिओप्लास्टीनंतर राज ठाकरे 'मातोश्री'च्या पायर्या चढले होते. निमित्त होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचं. पण या चर्चेमध्ये फक्त बाळासाहेब आणि राजचं नव्हते तर उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते. तब्बल एक तास 42 मिनीटं हि चर्चा झाली होती.