मुंबईमधे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, त्यानुसार काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. पहाटे मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मुंबईत मागील 3 दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे . सोमवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची धावपळ उडाली. अनेक सखल भागात पाऊस पडल्याने पाणी साचलं होतं. पहाटे 6 च्या दरम्यान पाऊस थोडा थांबला होता.
मुंबईत बोरिवली, मिलण, सबवे, सायन, किंग सर्कल या भागात पाणी साचलं होतं. पाऊस कमी झाल्यानंतर मात्र पाण्याचा निचरा होत आहे. पडलेल्या मुसळधार पावसाने रस्ते वाहतूक मंदावली होती. ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झाले होते. रेल्वे वाहतूक मात्र सुरुळीत सुरू आहे. मुंबइत पुढील 5 दिवस पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पावसामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मागील काही महिन्यांपासून दडी मारलेला पाऊस सोमवारी मात्र जोरदार पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सोमवारी संध्याकाळपासून पावसाने जोर धरल्याने रेल्वे बस पकडण्यासाठी लोकांना धावपळ करावी लागली. दादर, हिंदमाता, सायन धारावी वांद्रे, किंग सर्कल, बोरिवली या भागात पाऊस जोरदार कोसळला.

विजय पाटील म्हणाले, "सोमवारपासून मोठ्या प्रमाणत पाऊस पडत आहे. पाऊस मात्र पडायलाच हवा. पाऊस नसल्याने काळजी होती. पावसाची संततधार असल्याने थोडी धावपळ होत आहे." आशिष फडतरे म्हणाले की, "मान्सून सुरू झाल्याचा आनंद आहेच. सध्या पावसाची जोरदार हजेरी लावल्यामुळे घरी जायला वेळ होत आहे. पावसामुळे ट्रॅफिकदेखील वाढत आहे."