

पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील 500 जोडप्यांचा मनसेच्या वतीने सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती होती


यावेळी राज ठाकरे म्हणाले की, 'नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं. ह्या लग्न सोहळ्याने जो आनंद आणि समाधान दिलं तितकाच आनंद आणि समाधान आज अजून एका लग्न सोहळ्याने दिलं.'


पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या भागातील ५०० आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक लग्न सोहळा पक्षातर्फे घडवून आणला. ह्या बद्दल पालघर येथील तमाम महाराष्ट्र सैनिकांचं आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कुंदन संखे ह्यांचं राज यांनी अभिनंदन केलं.


मागील महिन्यात 27 जानेवारी रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे लग्नबंधनात अडकले आहे. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय एकत्र आले होते.


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह लग्नसोहळ्याला हजर होते.


विशेष म्हणजे, ठाकरे कुटुंबात 28 वर्षांनंतर हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी उद्धव, जयदेव ठाकरे हे सह कुटुंब हजर होते.


या लग्न सोहळ्याला राजकारणी, उद्योग, बॉलिवूड तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील पाहुण्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यावेळी लग्नसोहळ्याला हजर होते.


यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचलना दीदी लग्नसोहळ्याला आल्या होत्या. अमित आणि मिताली यांनी स्टेजवरून खाली येऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.