Home » photogallery » mumbai » PHOTO OF SHIV SENA LEADER SANJAY RAUT INTERVIEW TAKEN BY COMEDIAN KUNAL KAMARA GOES VIRAL MHAS
कंगना आणि जेसीबी...संजय राऊतांच्या नव्या मुलाखतीचे PHOTO झाले व्हायरल
कुणाल कामरा याने घेतलेली शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मुलाखत लवकरच सोशल मीडियावर प्रसारित होणार आहे.
|
1/ 6
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने घेतलेली शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मुलाखत लवकरच सोशल मीडियावर प्रसारित होणार आहे.
2/ 6
शट अप या कुणाल' या पॉडकास्टमध्ये घेतली जाणारी ही मुलाखत प्रसारित होण्याआधीच चर्चेचा विषय झाली आहे.
3/ 6
मुंबईत आज खार येथील एका खासगी स्टुडियोमध्ये या मुलाखतीचं चित्रीकरण करण्यात आलं.
4/ 6
संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक शैलीतून तर कुणाल कामरा हा त्याच्या उपरोधिक कॉमेडीच्या माध्यमातून कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे कायम चर्चेत असतात.
5/ 6
आजच्या या मुलाखतीत कंगना ते अर्णब आणि सुशांत ते कन्हैय्या या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या आहेत. इतकंच नाही तर मुलाखतीच्या केंद्रस्थानी बुलडोझर हे प्रॉप होते.
6/ 6
या बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे यावरही या मूलाखतीतून खुलासा होणार आहे. त्यामुळे दोघांच्या या मुलाखतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.