राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. मुंबईमध्ये वाढलेल्या पाऱ्यामुळे नागरिक परेशान आहेत. येत्या काही दिवसांमध्येही मुंबई शहरातील तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. काल 26 मे रोजी मुंबईमध्ये कमाल 35° तर किमान 29° तापमानाची नोंद झाली आहे. आज 27 मे रोजी कमाल तापमान 36° तर किमान तापमान 29° असणार आहे. वाढत्या तापमानामुळे प्रशासनाने उन्हात विनाकारण बाहेरपडू नये व तापमानापासून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.