होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 7


राज्याप्रमाणे मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या (Mumbai Covid update) घसरणीला लागली आहे. शनिवारी (7 नोव्हेंबरला) गेल्या तीन महिन्यातले सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
2/ 7


शनिवारी दिवसभरात 576 नवीन रुग्ण आढळून आलेत. शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 2,63,052 एवढी झाली आहे.
3/ 7


तर 245 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 2,35,657 एवढी झाली आहे.
4/ 7


दिवसभरात 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 10,419 एवढी झाली आहे.
5/ 7


शहरात सध्या 16,262 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण थोडा कमी झाला आहे.
6/ 7


तर दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने सगळ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.