पावसाचं थैमान : मुंबईत लोकल ट्रॅकवर पाणी, ठाण्याची बाजारपेठ, एसटी स्टँड पाण्यात; आजही Alert
मुंबई, ठाणे परिसरात शनिवारी सकाळपासून धुवांधार पाऊस कोसळत आहे. IMD ने परिसरात Red alert दिल्यामुळे नौसेना, NDRF सतर्क आहेत. कुठल्या भागात किती पाणी साठलं.. पाहा फोटो...
मुंबई, ठाण्यासह उपनगरांना 24 तासात मुसळधार पावसानं झोडपलं आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची पुन्हा तुंबई होण्याच सुरुवात झाली.
2/ 28
मुंबई आणि ठाण्यात धुवांधार पाऊस सुरूच आहे. रेल्वे ट्रॅकवरसुद्धा त्यामुळे पाणी साठलं.
3/ 28
मुंबई, ठाणे परिसरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. कुठल्या भागात पाणी साठलं त्याची झलक
4/ 28
ठाण्यात वंदना टॉकीज परिसरातल्या एसटी स्टँडजवळ फुटभर पाणी साठलं होतं. या वर्षीच्या पावसात पहिल्यांदाच पाणी साचलं आहे.
5/ 28
मुंबई किंक सर्कल परिसर
6/ 28
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता.
7/ 28
Coronavirus च्या लॉकाडऊनमुळे रस्त्यावर गर्दी कमी असली, तरी पाणी साठल्याने जनजीवन ठप्प झालं होतं.
8/ 28
किंग्ज सर्कल परिसर, मुंबई
9/ 28
खारकर आळी, ठाणे
10/ 28
ठाण्यातलं मार्केट ल़ॉकडाऊनमुळे बंद असल्याने बाजारात शुकशुकाट होता. त्यामुळे पाणी साचूनही फार नुकसान झालं नाही.
11/ 28
ठाण्यात वंदना टॉकीज परिसर पाण्याखाली. या भागात दरवर्षी पाणी साठतं.
12/ 28
ठाण्यात काही भागात अर्धा ते एक फूट पाणी साठलं होतं.
13/ 28
ठाणे परिसरात सकाळपासून दुपारी 2 पर्यंतच 70 मिमी पावसाची नोंद झाली.
14/ 28
ठाण्यात काही ठिकाणी फुटभर पाणी साठल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
15/ 28
खारकर आळी बाजारपेठ परिसरात पाणी वाढू लागल्यानंतर नालेसफाई करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी धावले आणि बंद गटारं मोकळी झाली.
16/ 28
पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने धुवांधार पावसाचं पाणी साचून राहिलं होतं.
17/ 28
कोरोनाचा कहर झाल्यामुळे ठाण्यात बाजारपेठा बंद आहेत. पावसामुळे लोकांना कंपलसरी लॉकडाऊन पाळावाच लागला.
18/ 28
राज्यात कोरोनाव्हायरसचा प्रकोप वाढत असताना सुरू झालेल्या मान्सूनमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढणार आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि अनेक उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. शुक्रवारीही मुंबईत पाऊस झाला. त्याची दृश्य...
19/ 28
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली
20/ 28
अंधेरीमध्ये मुसळधार पाऊस झाला. अशात अंधेरी सबवे बंद करण्यात आला होता. अंधेरीच्या सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं होतं.
21/ 28
सबवेच्या रस्त्यामध्ये जिथे जिथे पाणी साचलं तिथे पोलिसांकडून दोर लावून रस्ते बंद करण्यात आले.
22/ 28
मुंबई पहिल्याच मोठ्या पावसात अनेक सखल भागात पाणी साचलं. विशेषतः मेट्रोची काम सुरू असलेल्या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळालं.
23/ 28
चर्चगेट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं.
24/ 28
सायन भागात षण्मुखानंद सभागृह रोडवरील मुख्य रस्ता चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं
25/ 28
मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणासाठी तयार करण्यात आलेले सर्व्हिस रोडच जागोजागी खचल्यामुळे सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वाहतुकीला धोका निर्माण झाला.
26/ 28
वसई विरारमध्येही पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं.
27/ 28
नवी मुंबईतही मुसळधार पाऊस झाला. वाशी, बेलापूर, पनवेल भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.
28/ 28
या वर्षी पहिल्यांदाच पावसाने मुंबईची तुंबई झाली. लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने फारसे हाल जाणवले नाहीत.