

मुंबई, 10 जुलै : कालपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचलं आहे. अनेक गावांशी संपर्क तुटला आहे तर अनेक सखोल भागात पाणी साचलं आहे.


मुसळधार पाऊसमुळे रेल्वेरूळावर पाणी साचल्यानं भाईंदर ते विरार रेल्वेसेवा पूर्णपणे बंद. भाईंदर ते चर्चगेट रेल्वेसेवा धिम्यागतीनं सुरू.


मुंबईत पावसाचा जोर लक्षात घेऊन मुख्यध्यापकांनी सुट्टी जाहीर करावी अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.


पुढील काही तासात ठाण्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याचा अंदाज. गरज असेल तरच घराबाहेर पडा मनपाचे ठाणेकरांना आवाहन


नवी मुंबईला सलग चौथ्या दिवशी ही पावसाने चांगलेच झोडपून काढलंय. शहरातील नेरुळ, वाशी, बेलापूर, आणि ऐरोली मध्ये एकूण 135 मिली मिटर पावसाची नोंद झालीय. कधी नव्हे ते या वर्षी शहरातील सर्व सखल भागात पाणी तुंबलं आहे.


वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी, गोरेगाव ते वांद्रेदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा, जोरदार पावसाने ट्रॅफिक जाम


पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिक-ठिकाणी पाणी साचले आहे. तरी शक्यतो गाडीचा वापर टाळावा, आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा.


वसई-विरार भागाला विजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये शिरलं पाणी