

आज लॉकडाऊन सुरू होऊन 30 दिवस पूर्ण झाले. गेल्या 30 दिवसांमध्ये 24 तास धावत असणाऱ्या मुंबईमध्ये सर्वकाही थांबलं आहे. अशावेळी खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मुंबईतील काही न पाहिलेली दृश्य... All Photo Credit (PTI/गणेश काळे)


नेहमीच दाटीवाटी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील मार्गावर आज एकही माणूस दिसत नाही आहे.


कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस


प्रवासी मजूरांच्या चपला अशाच रस्त्यावर पडलेल्या होत्या, जेव्हा लॉकडाऊन वाढवल्यामुळे नाराज मजुरांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला होता.


देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान निर्जन रस्त्यावरून सुर्यास्तावेळी उडणाऱ्या फ्लेमिंगोंच्या थव्याचे मनमोहक दृश्य


वांद्रे रेल्वे स्थानकात पोलिसांनी आंदोलनकर्त्या प्रवासी मजुरांच्या जमावाला पांगवल्यानंतर पोलिसांना देखील सॅनिटाइझ करण्यात आलं.


सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेकांना वैताग आलेला असला तरी मात्र मुंबईत चक्क मोर दिसल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसला.


नेहमीच माणसांनी गजबजलेली मुंबई सध्या शांत झाली आहे. सातत्यानं गजबजलेले रस्त्यांवर सध्या चिटपाखरूही नाही.


मुंबईतल्या रतन टाटा इन्सिटट्यूट, बाबुलनाथ मंदीराजवळ, पारशी कॉलनी या परिसरात मोरांच दर्शन झालं.


मुंबईमध्ये अशाप्रकारे मोठ्या संख्येनं मोर दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. सक्तीनं लावलेल्या या लॉकडाउननं मुंबईकरांना सुखद धक्का दिला.


मुंबईतील या शांततेचाच परिणाम म्हणून की काय सध्या मुंबईमध्ये सकळी पक्षांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत.