Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


मुंबई शहरात आज पुन्हा एकदा भरधाव कारने धुमाकूळ घातली आहे. मुंबईत क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलच्या जवळ एका सुसाट कारने 8 जणांना चिरडलं आहे.
2/ 5


यातील 4 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 4 जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
3/ 5


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 वाजून 15 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. अचानक जनता हॉटेलच्या समोरील रोडवरून वेगात एक गाडी आली आणि हॉटेलसमोर उभा असलेल्या 8 जणांना उडवलं.
4/ 5


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. घटना घडल्यानंतर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.