मुंबईत मंगळवारी (23 जुलै) झालेल्या मुसळधार पावसात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. यात 15 जण जखमी झाली आहेत. जोरदार पावसामुळे परिसरात धुके पसरलं होतं. यामुळे येणारी-जाणारी वाहनं दिसत नव्हती. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अंधेरी परिसरातील ही घटना आहे. या अपघातात गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेवरील रेल्वे रुळांवरही पावसाचं पाणी आहे. हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.