दोन वर्षांपूर्वी ग्रेट डेन जातीच्या बाँन्ड नावाच्या श्वानाचे निधन झाले होते. त्यानंतर आता जेम्सनेही अखेरचा श्वास घेतला. आज या श्वानावर अंत्यासंस्कार करण्यात आले. यावेळी ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या लाडक्या श्वानाला शेवटचा निरोप दिला.