Home » photogallery » mumbai » MAHARASHTRA CHIEF MINISTER UDDHAV THACKERAY WILL BE ATTEND REPUBLIC DAY PROGRAM FIRST PUBLIC PROGRAM AFTER HIS SURGERY MHDO
Fit & Fine होऊन मुख्यमंत्री सर्जरीनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात, पाहा PHOTOS
आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) जल्लोषात मग्न आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने जवळपास अडीच महिन्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली.
|
1/ 6
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
2/ 6
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
3/ 6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महापौर किशोरी पेडणेकर, बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
4/ 6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी स्पाइन सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
5/ 6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना 2 डिसेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
6/ 6
यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली.