सर्वेश तिवारी,मुंबई, 27 आॅक्टोबर : वडाळा स्टेशन परिसरात बुधवारी रात्री झालेल्या खुनाचं गुढ उकलण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय. रेल्वे पोलिसांनी अवघ्या ४८ तासाचा या खुनाचा छडा लावलाय. या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एका तरुणीमुळे या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय.