Lalbaugcha Raja 2021: जगभरातील गणेशभक्तांचं आराध्य दैवत लालबागचा राजा यंदा होणार विराजमान; आज पाद्यपूजन सोहळा संपन्न, See PHOTOS
Lalbaugcha Raja 2021 : आज पहाटे लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. बघा पाद्यपूजनाचे फोटो...
|
1/ 15
जगभरातील गणेशभक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा (lalbaugcha raja) पाद्यपूजन सोहळा आज पहाटे सहा वाजता पार पडला.
2/ 15
कोविड 19 संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाद्यपूजन सोहळा पार पडला. (lalbaugcha raja 2021)
3/ 15
लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाद्यपूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला.
4/ 15
त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली.
5/ 15
दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते.
6/ 15
यंदा मात्र कोविड 19 संसर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती.
7/ 15
आता सर्व गणेशभक्तांना वेध लागलेत ते लालबागच्या राजाच्या स्थापनेची आणि दर्शनाची.
8/ 15
यंदा मुंबईची शान असलेला लालबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja) गणेशोत्सव साजरा होणार आहे.
9/ 15
गेल्या वर्षी कोविड 19च्या (Corona Virus) संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने "आरोग्य उत्सव" साजरा करून आदर्श निर्माण केला होता.
10/ 15
यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
11/ 15
त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
12/ 15
गेल्या वर्षी कोरोनाची स्थिती लक्षात घेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.
13/ 15
मात्र यंदा पुन्हा एकदा लालबागचा राजा दिमाखात विराजमान होणार आहे.
14/ 15
यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
15/ 15
दरम्यान गणेश मूर्तींच्या उंचीबाबत सरकारने नियमावली आखून दिली आहे. ते पाहता लालबागच्या राजाची मूर्ती यंदा चार फुटांची असेल असंही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.