मुंबईकरांनो, वर्षभरासाठी पाणी प्रश्न मिटला; तुमची जीवनवाहिनी असलेला 'हा' तलाव भरला
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी हा महत्वाचा तलाव तुडुंब भरला आहे.
|
1/ 8
बदलत्या वातावरणामुळे आणि सुरुवातील पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईवर पाणी संकट ओढावलं होतं पण आता मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आता मिटणार आहे.
2/ 8
कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी महत्वाचा तानसा तलाव तुडुंब भरलं आहे.
3/ 8
आज संध्याकाळी 7.5 मिनिटांनी तानसा तलाव वाहू लागला.
4/ 8
गेल्या वर्षी 25 जुलैला भरलेला तलाव यंदा 25 दिवस उशिरानं भरला आहे. मुंबई महानगराची जीवनवाहिनी असलेला हा तलाव आहे. वर्षभर यातून मुंबईला पाणीपुरवठा होतो.
5/ 8
हा तलाव गतवर्षी म्हणजेच दिनांक 25 जुलै, 2019 रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधी वर्ष 2018 मध्ये 17 जुलै रोजी, वर्ष 2017 मध्ये 18 जुलै रोजी तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच सन 2016 मध्ये हा तलाव 2 ऑगस्ट रोजी भरुन वाहू लागला होता.
6/ 8
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे.
7/ 8
कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी महत्वाचा तानसा तलाव तुडुंब भरलं आहे.
8/ 8
आज सकाळपर्यंत सातही तलावातील जलसाठा हा 12 लाख 62 हजार 119 दशलक्ष लीटर्स इतका असून तो क्षमतेच्या 87.20 टक्के एवढा आहे.